Header

Member Access Area

Log in

Login to your Triveni account

Username *
Password *
Remember Me
नमस्कार …
               प्रार्थनेला  भाषा नसते म्हणतात…
               पण नेहेमी म्हणायच्या संस्कृत   स्तोत्रांचे  अर्थ आपल्याला समजले तर आपली प्रार्थना नक्कीच
               वेगळ्या स्तरावर जाईल ,आणि आपल्याला  अधिक  समाधान देईल . 
  
                       स्तोत्र मंत्र -उपासनांचे  अंतरंग
                       श्री गणपती अथर्वशीर्ष  व रामरक्षा  भावार्थ ,गणेशमंत्र ,गायत्रीमंत्र  यांचा सूक्ष्म  अर्थ
                       यांसह उपासनेचे वर्म समजून  घेण्याचा योग आपल्याला येत आहे ,
                          स्वामी माधवानंद यांच्या प्रबोधनातून …
                      दिनांक :शनिवार  २६ एप्रिल २०१४
                      वेळ :    संध्याकाळी  ५ ते ७ 
                      स्थळ : डॉ . श्री व सौ  अनुराधा  विनायक कुलकर्णी  यांचे निवास स्थान
                     पत्ता:   7750, annesdale drive, cincinnati ohio, 45243 
                     फोन  नं :
                                 (शांतला  गंगातीरकर )
          
            डॉ. माधव नगरकर - अल्प परिचय
स्वामी माधवानंद  (डॉ. माधव नगरकर ) नाथ संप्रदायाच्या आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराज व पुढे स्वामी स्वरूपानंद व स्वामी माधवनाथ यांपर्यंत चालत आलेल्या ध्यानयोग प्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी आहेत. भगवद्गीता व ज्ञानेश्वरी मधील श्लोकांचे व ओव्यांचे सूक्ष्म विवरण करून त्यांतील अलौकिक  असे  दृष्टांत त्याच्या  अध्यात्माच्या उंचीसह साधकांना उलगडून दाखविणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे . शास्त्रीय संशोधन क्षेत्रात दोन तपे काम केल्यामुळे लाभलेल्या शास्त्रीय दृष्टिकोनामुळे  त्यांचे विवेचन आधुनिक पिढीला रुचणारे असते.
        संतांचे काव्यसौन्दर्य आणि त्यातील सूक्ष्म भावार्थ यांची उकल करून दाखविणे हा विशेष कार्यक्रम ते भारतात व परदेशात करीत असतात. ध्यानयोगाचे विशेष मार्गदर्शन , युवा केंद्रे व युवा शिबिरे घेणे आणि साहित्य निर्मिती हे त्यांचे कार्य "स्वरूपयोग प्रतिष्ठान " या संस्थेद्वारा चालविले जात आहे.
 
कार्यक्रम  स्थळी स्वामी माधवानंद लिखित ग्रंथ तसेच इतर साहित्य  उपलब्ध  असेल.
इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा .
त्यात ,नवे अर्थ विवरण करणारे तीन सुंदर ग्रंथ
१. श्री गजानन विजय भक्ति रसास्वाद
'गजानन विजय ' ग्रंथातील प्रसंगांतून श्री महाराजांचे अभिनव दर्शन आणि  भावार्थ विवरण
२. श्री गणपती अथर्वशीर्ष भावार्थ सार    व
३. श्रीरामरक्षा भावार्थ सार 
(स्तोत्रांमधील मंत्रांचे आणि पदांचे अर्थ आणि सुंदर कथांसह सूक्ष्म भावार्थ विवरण )
याबरोबरच ,
४. अमूर्त पूजेची फुले
आणि इतर  ग्रंथ
तसेच,  mp3 audio CDs
१. स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु श्रीरामकृष्ण -६८ भागांतील (एकूण २२ तासांचे ) विवरण
२.  असामान्य लोकमान्य -
    लोकमान्य टिळकांच्या जीवनावर  आधारित
३.  नवविधा भक्ती - दासबोधातील नऊ  भक्तींवरील विवरण
 
इत्यादी साहित्य ही  उपलब्ध  असेल .
 
   कार्यक्रमासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास खालील ई-मेल  वर संपर्क साधावा:
              dr.anuradha.kulkarni@gmail.com, or gangatirkar.shantala@gmail.com
 
स्वामींचे  वास्तव्य दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल  पर्यंत cincinnati  येथे असेल .
या दरम्यान कुणाला  स्वामींची भेट घ्यायची असेल तर कृपया वरील इ -मेल अथवा फोन वर संपर्क साधून
वेळ निश्चित करावी . तसेच यादरम्यान ध्यान सत्रे होतील . इच्छुकांनी कृपया आधी संपर्क साधावा .
 
 
Donation to TMM

Community Services
Triveni in action